शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (16:43 IST)

राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर

राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे आणि अशात राज्यातील नागरिकांना काळजीत टाकणारी माहिती समोर आलीय. राज्यातील निवासी डॉक्टर 31 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने शुक्रवार सकाळी 11 वाजेपासून संप सुरू करणार आहेत.
 
राज्यातील निवासी डॉक्टरांनी शुक्रवारपासून राज्यातील सरकारी रुग्णालये आणि कॉलेजेसमधील ओपीडी, नॉन इमरजन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा इशारा देण्यात येत आहे. सेंट्रल मार्डन लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डॉक्टर्स देखील संपात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.