बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (15:32 IST)

बापानेच अल्पवयीन मुलीला केलं गर्भवती नंतर लग्न लावून दिलं

माणुसकीला काळिमा फासणारा घृणास्पद प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आलाय. येथे घडलेल्या एका खळबळजनक आणि संतापजनक घटनेत एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तिला गर्भवती केले आणि नंतर तिचे लग्न लावून दिलं. अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली असून बाळ जन्माला आलं आहे.या प्रकरणी पोलिसांनी नराधम वडिलांसह अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या पतीलाही अटक केली आहे. 
 
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार दीड वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर ती आपल्या वडिलांसोबत रहात होती. धक्कादायक बाब म्हणजे या दरम्यान नराधम बापाने पीडित मुलीशी शारीरीक संबंध ठेवले. नंतर मुलगी गरोदर राहिल्यानंतर बापाने समाजातीलच एक मुलाशी पीडितेचे लग्न लावून दिले. अल्पवयीन पीडितेसोबत पतीने शारीरीक संबंध ठेवले परंतु ती अगोदरच गर्भवती असल्याचे कळल्यावर पतीने पीडित मुलीला पुन्हा नराधम बापाकडे आणून सोडले. नंतर पीडित मुलीची सोलापूर येथील हॉस्पीटलमध्ये प्रसूती झाली. तिथे तिने एका बाळाला जन्म दिला.
 
हा पूर्ण प्रकार समजल्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलीसांनी पीडित मुलीच्या जबाबानंतर बालिकेवरील लैंगिक अपराध या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम वडील आणि अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणार्‍या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.