बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (13:23 IST)

भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. तसेच गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
 
28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते तसेच त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. 
 
दोन दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोना झाल्याचे उघड झाले होते आणि त्यादेखील अधिवेशनात उपस्थित होत्या. 29 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पती सदानंद सुळे व त्यांची दोन्ही मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती.