बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (08:24 IST)

पोलिस आयुक्तालय विशेष शाखेतील कर्मचार्‍याचा मृतदेह विहिरत सापडला

नाशिक पोलिस आयुक्तालात विशेष शाखेत कार्यरत असलेले विलास सुरेश सोनार यांचा मृतदेह विहिरत सापडल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सोनार हे अशोक स्तंभ ढोल्या गणपती चे मागे राहत होते. ते विशेष शाखेत ते कार्यरत होते.सरकारवाडा पोलिस ठाण्याचे हद्दीत त्यांची ड्युटी होती. आसाराम बापू पूल जवळ बागड इस्टेट येथील काकड मळा विहिरीत मृत देह आढळून आला. दहा बारा दिवसांपासून ते कामावर हजर नव्हते.दुपारी २.३० चे सुमारास विहिरीत बॉडी सापडली अशी माहिती पोलिसांनी दिली.म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेबद्दल पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दु:ख व्यक्त केले. सोनार हे विभागातील तत्पर कर्मचारी होते व त्यांच्याकडे प्रचंड गोपनीय माहिती असायची या शब्दात दु:ख व्यक्त केले.