बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (12:13 IST)

पीकअप गाडी उसाच्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

सिल्लोड : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
 
सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर पीकअप गाडी उसाच्या ट्रकला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार  भराडी रोडवर ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याचे कडेला नादुरुस्त अवस्थेत उभे होते. यावर छोटा टेम्पो आदळून हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
अपघातात या लोकांचा जागीच मृत्यू झालाय. मृत व्यक्ती या मंगरूळ तालुका  सिल्लोड या गावचे आहेत. मृतांची नावे जिजाबाई गणपत खेळवणे ( वय 60 वर्ष ), संजय संपत खेळवणे (वय 42 वर्ष), संगिता रतन खेळवणे ( वय 35 वर्ष ), लक्ष्मीबाई अशोक खेळवणे ( वय 45 वर्ष ), अशोक संपत खेळवणे ( वय 52 वर्ष ), अशी आहेत. मृतदेह सिल्लोड रुग्णालय येथे नेण्यात आले आहेत.