मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (17:02 IST)

अवघ्या 10 रुपयांसाठी प्रवाशाचा खून

एका धक्कादायक घटनेत एका रिक्षाचालकाने अवघ्या दहा रुपयांसाठी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील कामाक्षी चौक परिसरात घडली. 
 
नेमकं काय घडलं?
मिर्झा मुझफ्फर हुसैन मिर्झा अली हुसैन यांना शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून कामाक्षी चौक परिसरात जायचं होतं. त्यासाठी ते बाबा सुलेमान बावजीर नावाच्या इसमाच्या रिक्षात बसले. कामाक्षी चौक येथे पोहोचल्यानंतर रिक्षाभाडं देताना मुझफ्फर यांचा रिक्षा चालक बावजीरसोबत 10 रुपायावरून वाद झाला. मुझफ्फर यांनी रिक्षा चालक बाबा याला 20 रुपये दिले होते परंतु रिक्षाचालकाने आणखी 10 रुपये द्यावे लागतील असे म्हटले तेव्हा वादाला सुरुवात झाली. 
 
दहा रुपयावरून सुरू झालेला हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. रिक्षाचालकाने हाताने आणि डोक्याने मुझफ्फर यांच्या नाकावर नाकावर मारहाण करुन त्यांना जखमी केलं. त्यांच्या नाकातून रक्त आल्याने ते रक्तबंबाळ झाले होते तर त्यांच्या डोक्यालाही मार लागला होता.
 
या घटनेत जखमी झालेल्या मुझफ्फर यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी मुझफ्फर यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

photo: symbolic