बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (16:18 IST)

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला मोठा दिलासा

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात दिलासा मिळाला आहे. आता आर्यनला  दर शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी जावे लागणार नाही. जामिनाची ही अट रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने शाहरुख खानला हा दिलासा दिला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जेव्हा एसआयटी समन्स पाठवेल तेव्हा त्याला दिल्लीत हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. ही अट फेटाळण्यात यावी, अशी याचिका आर्यन खानच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आली होती.
आर्यन खानला 3 ऑक्टोबरला एनसीबीने अटक केली होती, त्यानंतर या प्रकरणात बरीच कारवाई होताना दिसत होती. ही बातमी समजताच सुपरस्टार शाहरुख खान शूटिंग सोडून स्कॉटलंडहून भारतात आला आणि तेव्हापासून त्याची संपूर्ण कायदेशीर टीम आर्यनला जामीन मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत होती.
आर्यन खानला जामीन मिळाल्यावर त्यात अनेक अटी जोडण्यात आल्या होत्या, त्यापैकी ही एक अट होती. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागत होते, मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला तसे करावे लागणार नाही. न्यायालयाच्या या आदेशामुळे त्याला दिलासा मिळाला आहे.