1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 डिसेंबर 2021 (15:44 IST)

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांचा लोकलने प्रवास

State Agriculture
राज्य कृषी मंत्री दादा भुसे हे कार्यक्रमानिमित्त आले असता वाहन वाहतूक टाळून मुंबई लोकलने प्रवास केला. त्यांचा हा लोकल प्रवास हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे गोरेगाव येथील कार्यक्रमास सकाळी उपस्थित होते. मात्र दुपारी १२ वाजता मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत पीक कर्जा बाबत बैठक असल्याने सदर बैठकीस वेळेवर पोहचण्यासाठी भुसे यांनी थेट लोकल प्रवासाला प्राधान्य दिले.
यावेळी त्यांनी वेळेत पोहचण्यासाठी वाहतूक कोंडीत न अडकता रेल्वे ने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. गोरेगाव रेल्वे स्थानक गाठून तेथून लोकलने चर्चगेट पर्यंत प्रवास करून मंत्रालयात गेले. गोरेगाव स्थानकापासून चर्चगेटपर्यंतचा प्रवास केल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत आज पीक कर्जा बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित राहिले. मात्र यावेळी स्वतःचे वाहन न घेता लोकलने प्रवास करून इतरांना आश्चर्याचा धक्का दिला.