रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (08:07 IST)

मालेगावच्या नावाला गालबोट लावणाऱ्यावर कारवाई व्हावी ; कृषिमंत्री दादा भुसे

मालेगावच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. देशाच्या, राज्याच्या दृष्टिकोनातून ही बाब योग्य नाही.त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. मालेगाव दगडफेक प्रकरण; तिघे संशयीत ताब्यात, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार
 
गेल्या वीस वर्षांत अनेक घटना घडल्या मात्र मालेगावतील सर्वधर्मीय जनतेने शांतता अबाधित ठेवण्याचे काम केले आहे. मात्र आज त्रिपुरा घटनेच्या संदर्भात बंद ठेवण्यात आला होता.प्रशासनाला निवेदन देण्याच्या पार्श्वभूमीवर काही लोकांनी शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला देशाच्या, राज्याच्या दृष्टिकोनातून ही बाब योग्य नाही.या गोष्टीचा मी निषेध करतो ज्या नागरिकांनी मालेगावच्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला अशा लोकांवर  कठोर कारवाई व्हावी..अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली.मालेगावात सध्या शांततापूर्ण असे वातावरण आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता जनतेने शांतता राखावी असे आवाहन भुसे यांनी केले.