1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Fadnavis was very angry over Nitesh Rane case

'या' प्रकरणावरून फडणवीस चांगलेच संतापले

नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारल्यावर हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर नारायण राणेंनी दिलं होतं. आता हे प्रकरण दिवसेंदिवस तापत असून यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत.
 
सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! सीआरपीसी १६०ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे, असं फडणवीसांनी ट्वीट करून म्हटलंय.
पुढील लेख
पार्थ पवार याचं ट्वीट, म्हणाले आत्या काळजी घ्या, तुम्ही दोघे लवकर बरे व्हाल