रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (15:41 IST)

वाचा, संचारबंदी विषयी महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या

ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढतोय. परंतु मुंबईकरांनी घाबरून जाऊ नका, तुमच्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. प्रत्येकाला काळजी घ्यावी लागेल. तसेच विनामास्क घराबाहेर जाऊ नये, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महापौर म्हणाल्या की, मुंबईमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी किशोरी पेडणेकर यांना विचारला असता, यासंदर्भात अद्यापतरी माहिती माझ्याकडे आलेली नाहीये. कारण संचारबंदी आणि हॉटेलचं जर आपण कनेक्शन बघितलं तर एखाद्याला खायचं जरी असलं तरी दहा पैकी एकच जण हॉटेलमध्ये वस्तू किंवा एखादं खाद्य घेऊन जाण्यासाठी येतात. त्यामुळे पाचपेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्यांना हा नियम लागू होतो.