शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (14:57 IST)

महानायक अमिताभ करणार पंढरीची वारी : सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर देणार विठ्ठल दर्शनाचे निमंञण

महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणुन पंढरीच्या विठुरायाची ओळख आहे. वर्षांतील चार वार्‍यांना देशभरातून लाखो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात. कष्टकरी, गोरगरीबांचा असणार्‍या विठ्ठल व रुक्मिणीच्या दर्शनासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंञण देणार असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
नुतन वर्षातील पहिल्याच येणार्‍या पुञदा (वैकुंठ) एकादशीनिमिlत महानाय अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत ट्विट हॅण्डलवर श्री विठ्ठल रुक्मिणीचा फोटो ठेवून पोस्ट केली होती. त्यांच्या या विठ्ठल भक्तीमध्ये लिन होण्याच्या पोस्टला देशातून अनेकांनी ‘लाईक्स’ व ‘कमेंट्टस’ मिळाल्या आहेत. यामध्ये खा.सुप्रिया सुळे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांच्या या विठ्ठल भक्तीबाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी फोनद्वारे बातचित केली असता त्यांनी मंदिर समितीच्यावतीने ‘बीग बी’ यांना दर्शनासाठी निमंञण देण्याचा मानस व्यक्त केला आहे. याचबरोबर त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून पंढरपूर व पांडुरंग यांचा केलेला गौरव महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या गौरवानंतर केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी महामार्गाच्या कामामूळे भाविकांचा आळंदी ते पंढरपूरचा प्रवास जलद व सुखद होत असल्याचे सांगीतले.
 
मंदीराचे द्वार सर्वांसाठी खुले आहे.
विठ्ठल हा गोरगरीब व कष्टकरी लोकांचा देव असला तरी भाविकांबरोबरच देश व विदेशातील अनेक दिग्गज व्यक्तींनी दर्शनासाठी पंढरीची वारी केली आहे. त्यामुळे महानायक अमिताभ बच्चन यांना दर्शनासाठी निमंञण देण्याचा आमचा मानस असून ते विठ्ठल दर्शनासाठी आल्यास आनंदाची बाब आहे.- गहिनीनाथ महाराज औसेकर(सहअध्यक्ष श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर)