शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अखेर जायकवाडीचे दोन दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरु

नाशिक सोबत उत्तर महाराष्ट्रात गोदावरी नदीला पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना मराठवाडा मात्र अजूनही पाऊस झाला नाही. मात्र  नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दमदार  पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण ९० टक्के पेक्षा अधिक भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला त्यामुळे  आता जायकवाडीचे दोन दरवाजे अर्धा फूटांनी उघडण्यात आले आहे. यातून एक हजार ४७ क्यसेक (एक क्युसेक म्हणजे २८.३१ लिटर) वेगाने गोदावरीत पाणी सोडण्यात आले आहे. 
 
पूर्ण राज्यात आईवेळी कमी दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र दुष्कळा ग्रस्त मराठवाड्याकडे पाठ फिरवली आहे. आता तर पावसाळा संपत आला असून, अजूनही त्या ठिकाणी  समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक धरण कोरडी पडली आहेत. तर दुसरीकडे गोदावरी नदीचाच उगम उगम असलेल्या नाशिक, नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार  पावसामुळे व नाशिकला आलेल्या महापुरामुळे जायकवाडीत पाणी आल्याने औरंगाबाद, जालना, परभणीसह काही जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. 
 
नाशिक, नगरकडून येणाऱ्या पाण्यामुळे जायकवाडी मोठ्या प्रमाणत भरत आले असून, त्यामुळे  नाथसागरात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील तहानलेल्या गावांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला होता. त्याची अमलबजावणी करण्यात आली आहे. अजूनही नाशिक नगर येथे परतीचा पाऊस सुरु होणार आहे, त्यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणत पाणी जयकवाडीत जमा होईल त्यामुळे त्याचा फायदा औरंगाबाद सोबत जालना आणि इतर कोरड्या जिल्ह्यांना नक्कीच होणार आहे.