suvichar
✕

आंदोलकाच्या दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा कारणीभूत - जयंत पाटील

Updated: मंगळवार, 24 जुलै 2018 (09:19 IST)
 
या घटनेच्या निषेधार्थ प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडताना ते पुढे म्हणाले, "आषाढी एकादशीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेस पोलिस व प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा जबाबदार आहे, आंदोलनकर्त्या तरुणांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने काकासाहेब शिंदे या आंदोलकाचा बळी घेतला आहे."
 
याआधी मराठा समाजाने शांतपणे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले, इतके दिवस उलटूनही सरकारने अद्यापही मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. मराठा क्रांती मोर्चामधील तरूणांनी निवेदन दिले असताना आणि अशी घटना घडू शकते याबाबतची माहिती असतानाही प्रशासनाने कोणतीही आवश्यक खबरदारी घेतली नाही वा घटना रोखण्यासाठी पावले उचलली नाहीत, त्यामुळे प्रशासनाची दिरंगाईच यासाठी कारणीभूत असल्याची टीका आ. पाटील यांनी केली आहे.
 
"या सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या, मुस्लिम आणि लिंगायत समाजाचे आरक्षण प्रलंबित आहे. ओबीसी समाजातील सर्व घटकांना सरकारने फसवी आश्वासने दिली, आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. दलित समाजातही असंतोष आहे. आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची भाषा केंद्रीय मंत्री करतात. सरकारची पलायनवादी भूमिका याला कारणीभूत आहे. त्यामुळे सर्वच समाजांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. एवढी अशांतता, अस्थिरता याआधी महाराष्ट्राने कधी अनुभवली नव्हती," असा उद्वेग आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
 
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतेही राजकारण करायचे नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. तुम्ही मतांच्या माध्यमातून आपली नाराजी प्रकट करा, असे आवाहन त्यांनी आंदोलकर्त्या तरूणांना केले. तसेच सरकारने जनतेचा अंत पाहू नये, आरक्षणाबाबत त्वरित भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

World Cotton Day 2026 जागतिक कापूस दिवस का साजरा केला जातो? इतिहास थीम आणि महत्त

LIVE: पोलीस दलांचा सन्मान, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ

पुणे महापौरांचे रोहित पवार यांना' पुणे बंद'ची धमकी दिल्यानंतर उघड आव्हान

उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सर्व आठ राज्यसभा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा आणि का साजरा केला जातो इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments