1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईच्या समुद्रकिनार्‍यांवर विषारी जेलीफिश, चावून बधिर करू शकते

jellyfish at Mumbai beaches
महाराष्ट्राच्या गिरगौम आणि जुहू किनारपट्टीवर विषारी जेलीफिश बघण्यात आली. यावर सरकारने लोकांना समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला दिला आहे.
 
मत्स्य व्यवसाय विभागाचे राज्य आयुक्त अरुण विधाले यांनी म्हटले की जेलीफिश समुद्राच्या लाटांसोबत वाहत आहे.
 
त्यांनी म्हटले की जेलीफिश व्यक्तीच्या संपर्कात आल्यास चावते. ज्याने वेदना होऊन तेवढा भाग लाल होऊन जातो. याने व्यक्ती बधिर देखील होऊ शकतो किंवा शरीराचा तेवढ्या भागाचे सेंसेशन नाहीसं होतं. 
 
यावर उपचार म्हणून व्यक्तीला प्रभावित भागेवर व्हिनेगर किंवा गरम पाणी टाकले पाहिजे. वेदना असल्यास तात्काळ मेडिकल मदत घेतली पाहिजे.