शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (11:23 IST)

'ती' केवळ अफवा, त्यावर कुणी विश्वास ठेवू नये, शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

10 वी आणि 12 वी च्या उत्तीर्णतेच्या पात्रतेत कुठलाच बदल करण्यात आला नसल्याचं राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं आहे. यावर्षी उत्तीर्ण होण्यासाठी 35 ऐवजी 25 टक्के गुण पुरेशे ठरणार असल्याची चर्चा होती. पण ती केवळ अफवा आहे,. त्यावर कुणी विश्वास ठेवू नये असं मंडळातर्फे आवाहन करण्यात आलं आहे.
 
दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे. पण दुसरीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आता याबाबत पुढील दोन दिवसात बोर्डाकडून पुन्हा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहे. 
 
दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 दरम्यान होणार असून बारावीचे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 दरम्यान होणार आहे. परीक्षा या लेखी पद्धतीनेच होणार आहे, असं या आधीच सरकारने स्पष्ट केलं आहे. पण आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रोज वाढत जाणारी रुग्णसंख्य़ा यामुळे प्रशासन आणि बोर्ड काय निर्णय घेतो हे पाहावं लागेल. सोशल मीडियवर दहावी आणि बारावी परीक्षांबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वान न ठेवण्याचं आवाहन बोर्डाने केलं आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती दिली जाणार आहे.