शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जानेवारी 2021 (12:06 IST)

कोव्हिड-19 लशींबद्दल अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची केंद्र सरकारची सूचना

कोव्हिड-19 लशींच्या परिणामकारकतेबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. कोव्हिड-19 लशीबाबत चुकीची आणि अपुरी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्रं पाठवली आहेत.
 
सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी सुरक्षित आणि प्रतिकारक्षम असल्याचं राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाला आढळले आहे, असं अजय भल्ला यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
 
देशभरात 16 जानेवारीपासून कोव्हिड-19 विरुद्ध लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.