सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (07:23 IST)

राज्यात २ हजार ८८६ नवे कोरोनाबाधित आढळले

राज्यात गुरुवारी दिवसभरात ३ हजार ९८० जणांनी कोरोनावर मात केली, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर, २ हजार ८८६ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ५२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ८७८ वर पोहचली आहे.
 
सध्या राज्यात ४५ हजार ६२२ अॅक्टिव्ह केसेस असून, १९ लाख ३ हजार ४०८ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, कोरोनामुळे ५० हजार ६३४ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
 
सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९५.१३ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,१९,१८८ नमुन्यांपैकी २० लाख ८७८ (१४.२७टक्के) नमून पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १२ हजार २३ जण गृहविलगीकरणात तर, १ हजार ९३६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.