1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (22:55 IST)

घरीच बनवा ग्रेव्ही भाजी मसाला

homemade grevhi recipes
घरीच बनवा उत्कृष्ट ग्रेव्ही भाजी मसाला, ज्या मुळे हे कोणत्या ही भाजीत वापरता येत. आणि चवीत देखील चांगले असत. आता ग्रेव्हीची भाजी कधीही बनवू शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
 
 
साहित्य- 
 
4 मोठे कांदे,4 टोमॅटो,25 ग्रॅम आलं, 25 ग्रॅम लसूण, कोरडी लाल मिरची,1 चमचा हळद,2 चमचे लाल तिखट, 1 चमचा जिरे पूड 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, गरजेपुरते तेल.
 
 
साहित्य -
 
 कांदा,लसूण टोमॅटो, आलं ह्यांचे  मोठे तुकडे कापा.आता पॅन मध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये लाल मिरची, आलं, लसूण परतून घ्या. 
नंतर कांदा टोमॅटो टाकून परतून घ्या. थंड करून ह्याचे वाटण करा. या पेस्ट ला जास्त तेलात परतून घ्या. या मध्ये सर्व कोरडे मसाले घाला गरम मसाला,धणेपूड,जिरेपूड,हळद, तिखट. या वाटण ला थंड करून  फ्रीजमध्ये ठेवून द्या. आपला इन्स्टंट ग्रेव्ही भाजीचा मसाला तयार. कोणत्याही भाजी सह वापरा.