बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (22:21 IST)

चविष्ट पान कोबी आणि पनीर पराठा

साहित्य- 
 
कणकेसाठी
1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा साजूक तूप वितळलेले, मीठ चवी प्रमाणे,  
 
सारणासाठी -
पाव कप किसलेली पान कोबी, 1 /2 कप कुस्करलेले पनीर,2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 /2 लहान चमचा आमसूल पूड, मीठ चवीप्रमाणे,तेल.
 
कृती -
 
कणीक मळण्यासाठी -
एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या. तूप आणि चवीपुरती मीठ घाला लागत लागत पाणी घालून कणीक मळून घ्या. कणीक मऊसर मळावी चिकट नसावी. आता 10 ते 15 मिनिटे कणीक झाकून  ठेवा.  
 
सारणासाठी -
किसलेली पान कोबी एका भांड्यात काढून घ्या त्यात कुस्करलेले  पनीर, कोथिंबीर हिरव्या मिरच्या, मीठ आणि आमसूल पूड घाला. सर्व साहित्य हाताने एकत्र करून मिसळून त्याचे लहान लहान गोळे करून ठेवा.
 
आता कणकेच्या लहान लहान लाट्या करा. आणि त्या लाटींना पुरीच्या आकाराच्या लाटून घ्या .त्या पुरी मध्ये सारण भरा आणि त्यावर  एक अजून पुरी ठेवा आणि कडेला पाण्याचा हात लावून कडे बंद करा जेणे करून सारण बाहेर निघू नये. 
 
नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यावर कोबी-पनीर पराठा घाला. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. आता या पराठ्याला तेल लावून दोन्ही बाजूने शेकून घ्या मंद आचेवर शेकायचं आहे. चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने शेकल्यावर गरम कोबी-पनीर पराठा दह्यासह सर्व्ह करा.