शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (07:25 IST)

राज्यात २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित दाखल

राज्यात रविवारी २ हजार ७५२ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय १ हजार ७४३ जण कोरोनामुक्त झाल्याने, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ९ हजार १०६ वर पोहचली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४४ हजार ८३१ असून, १९ लाख १२ हजार २६४ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ५० हजार ७८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
दरम्यान, करोनावरील लस घेण्यात कुठलाही धोका नाही. कोविड प्रतिबंधक लशींची क्षमता व सुरक्षा चांगली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवकांशी संवाद साधताना स्पष्ट केलेले आहे. लशीबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी आवाहन देखील केले आहे.