सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (21:54 IST)

काकड आरती स्पीकर शिवायच होणार; 'भोंगा' वादानंतर शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय

shirdi
राज्यात सुरु असलेल्या भोंग्याच्या वादानंतर शिर्डीच्या  साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. साईबाबांच्या मंदिरात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या लाऊडस्पीकरवरील रात्रीची शेज आरती तसेच पहाटेची काकड आरती सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशान्वये जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार बंद करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी ही माहिती दिली असून, साईमंदीरातील दैनंदिन 5 आरत्यांपैकी 3 आरत्या लाऊडस्पीकरवर तर 2 आरत्या लाऊडस्पीकर शिवाय होणार आहे.
 
दरम्यान, राज्यात मशिदीवरील भोंगे (Azan Loudspeaker) उतरविण्यात यावे यासाठी मनसेच्या  वतीने राज्य सरकारला 4 मे पर्यंत अल्टिमेटम दिला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 4 तारखेपर्यंत भोंगे उतरवले नाही, तरा राज्यात मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी राज्य शासनाने सर्वपक्षीय बैठक घेऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सर्व धार्मिक तसेच इतर कार्यक्रमात लाऊडस्पीकर बंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरास अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे पालन करण्याचे पत्र देण्यात आले आहे.