रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑगस्ट 2023 (13:28 IST)

कळवा: ठाण्याच्या मनपा रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू

17 patients died in a single night
ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री उपचाराधीन असलेल्या 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मृत्यूला अखेर जबाबदार कोण आहे असा सवाल संतप्त नातेवाईक करत आहे. या पूर्वी या रुग्णालयात एकाच दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत आहे. या रुग्णालयात आयसीयु मध्ये उपचाराधीन 13 रुग्ण आणि जनरल वॉर्ड मधील 3 रुग्ण असे  एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

या रुग्णालयात उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या रुग्णालयात रुग्णांवर तपासणी करण्यासाठी डॉक्टर वेळो वेळी तपासणी करायला येत नाही. या मुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे.  

Edited by - Priya Dixit