बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (08:19 IST)

ठाणे महापालिकेच्या दिमतीला गुजरात पासिंगच्या गाड्या, हे काय गौडबंगाल? photo

thane mahanagar palika
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज एक फोटो शेअर करत मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीचा फोटो शेअर केला आहे. ही गाडी चक्क गुजरात पासिंगची आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.
 
ठाणे महापालिकेच्या दिमतीला,गुजरात पासिंगच्या गाड्या. हे काय गौडबंगाल आहे नेमक? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेला केला आहे. त्यांनी सोबत कचऱ्याच्या गाडीचा फोटो शेअर केला आहे. आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस पडणारे मात्र कितीही पाऊस पाडला तरी निष्ठाच जिंकणार असून पालिकेवर उद्धव ठाकरेंचा भगवा आम्ही फडकवणारच असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाडांनी केल्यामुळे ठाण्यात राजकीय चर्चांना एकच उधाण आले आहे.
 
आगामी काळातील ठाणे शहरातील मविआची वाटचाल कशा प्रकारे असेल हेच एकप्रकारे सूतोवाच त्यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फाटाफुटीवर चांगलेच तोंडसुख घेतले. ज्यावेळी उद्धव साहेब आजारी होते पूर्ण शरीर विकलांग झाले होते ऑपरेशनला जात होते. त्यावेळी त्यांनी काही मोजक्याच जणांना फोन केले होते त्यातील मी एक होतो. मला म्हणाले प्रश्न मोठा आहे तुम्ही सर्व मिळून महाराष्ट्र ची काळजी घ्या. आणि नंतर आपल्याला माहितीच आहे काय झाले ते त्यामुळे या महाराष्ट्र मध्ये एक संताप आहे. जनता विसरलेली नाही येणाऱ्या निवडणुकीत ठाण्यात उद्धव साहेबांचा भगवा आणि राज्यात मविआ सत्तेत येणारच असा विश्वास आव्हाडांनी व्यक्त केलाय.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor