येवल्यात शिवसेना-ठाकरे गटाला मोठा धक्का, कल्याणराव पाटील यांनी धरला अजित पवारांचा हात
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येवलाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी ठाकरे गट सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज मुंबईत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
कल्याणराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने या भागातील पक्षाचा जनाधार आणखी मजबूत होईल, असे मानले जात आहे. येवला हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो.