1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Karuna Sharma in trouble again A case has been registered on the spot for threatening

करुणा शर्मा पुन्हा अडचणीत; धमकी दिल्याप्रकरणी ठिकाणी गुन्हे दाखल

बीड : शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा शर्मा यांच्यासह अन्य एकावर, फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून बीड जिल्ह्यामध्ये परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये आणि केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान, करुणा शर्मा यांनी सोमवारी (दि. २३) पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये, धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असणाऱ्या बालाजी दहिफळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप देखील या तक्रारीमधून करण्यात आला होता. परंतु ज्यांच्या विरोधात शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती, त्यांनी देखील काल (दि. २४) परळी पोलीस स्टेशनमध्ये शर्मा यांच्या विरोधात धमकी देत शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी करुणा शर्मांसह, अजय देडे यांच्यावर परळी पोलीस स्टेशनमध्ये कलम ५०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
तसेच ‘करुणा शर्मा यांनी जे आरोप केले आहेत, ते आरोप खोटे आहेत. जर ते आरोप खरे असतील, त्याचा पुरावा शर्मा यांच्याकडे असेल, तर मला भर चौकात फाशी द्या. मात्र माझ्याकडे त्यांनी दिलेल्या धमकीचे, शिवीगाळीचे पुरावे आहेत. ते मी पोलीस अधीक्षकांना देणार आहे’ असे म्हणत बालाजी दहिफळे यांनी फेसबुक पोस्ट करत, शर्मा यांनी खुले आव्हान दिले आहे. यामुळे आता शर्मा- मुंडे वाद काय रंग घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
उद्धव ठाकरेंनी मुद्दे मांडायला आता एखाद्या प्रवक्त्यांची नेमणूक करायला हवी, दीपक केसरकर यांचा टोला