1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 जून 2023 (15:00 IST)

केसीआर महाराष्ट्रात दाखल

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळासह सोमवारी पंढरपुरात दाखल झाले असून ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात त्यांनी सभा घेतल्या.या सभेचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला  केसीआर हे महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राकडे निघाले आहे. 

महाराष्ट्रात केसीआर यांना महाराष्ट्र भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे. ते महाराष्ट्रात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. त्यांचा समवेत तेलंगाणाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार इतर नेता आहे. केसीआर यांचा 600 गाड्यांचा ताफा महाराष्ट्रात दाखल होणार.
 
मराठवाड्यात आणि विदर्भात शेतकऱ्यांना पक्षात येण्याचं आवाहन करत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पाहोचण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न आहे. केसीआर भाजप-शिंदे सरकार आणि माविआ यांचा पुढे आव्हान करण्याची स्थिती निर्माण करत असल्याचे वृत्त मिळत आहे. 
 
Edited by - Priya Dixit