1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : सोमवार, 18 मार्च 2024 (12:08 IST)

एकविरा देवी पालखी सोहळा: आदिशक्ती एकविरा आई जागृत देवस्थान

Adishakti Ekvira aai palkhi sohla2023 aai ekvira aai mahiti in marathi  आई एकविरा देवी मंदिर mahiti Informationa About Adishakti Ekvira AAi Mahiti in Marathi  Aai Ekvira Mandira Itihas Mahiti   lonavala karla leni  maharashtra Tourism Bhatakanti marathi aai ekvira devi mandir karlra leni Lonavala maharashtra place आई एकविरा देवी मंदिर लोणावळा कारल्याची लेणी  आदिशक्ती एकविरा आई जागृत देवस्थान महाराष्ट्र दर्शन मराठी
आई एकविरा देवीचा पालखी सोहळा 28 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील लोणावळ्यात  कार्ल्याच्या लेणी जवळ आई एकविरा देवीचे मंदिर आहे.आगरी-कोळी समाजाचे बांधव येथे आईच्या पूजेसाठी येतात.हे कुणबी समाजाच्या लोकांची कुलदैवत देखील आहे. या मंदिरामध्ये एकसारख्या बांधणीची एका ओळीत बांधलेली मूळच तीन मंदिरे पश्चिममुखी आहे.अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्रात येथे भाविकांची गर्दी ओसंडून येते. येथे पशुबळी देण्याची प्रथा देखील आहे. हे देवस्थान जागृत आहे. ही देवी चमत्कारिक आहे.ही देवी आई नवसाला पावणारी आहे.महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश, राजस्‍थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्‍याने येथे सतत वर्दळ असते.आगरी कोळी समाजाचे भाविक येथे पूजेसाठी येतात .चैत्र महिन्यात या मंदिरात पालखी सोहळा होतो. चैत्र महिन्यात भाविकांची गर्दी असते.  
 
भक्‍तांच्‍या संकटांना दूर करून त्‍यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्‍वयंभू अशी ही देवी असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे. आपल्‍या पराक्रमाने तिन्‍ही लोकी नावलौकीक मिळविलेल्‍या परशूराम या वीरपुत्राची जननी म्‍हणून आदिशक्‍ती एकवीरा देवी ओळखली जाते. एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्‍याची धारणा आहे. जमदग्‍नी ऋषींची पत्‍नी असलेल्‍या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्‍याने या देवीस 'एक वीरा' असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्‍हणून रूढ झाले.
 
हे मंदिर पांडवकाळातील आहे.त्यांनी आपल्या वनवासाच्या काळात हे बांधले होते.अशी आख्यायिका आहे की पांडवांच्या वनवासाच्या काळात आई एकवीरेने त्यांना दृष्टांत देऊन मंदिर बांधण्याची आज्ञा दिली.आणि देऊळ एका रात्रीच बनवायची अशी अट घातली.पांडवांनी आईची अट मान्यकरून एकाच रात्रीत  हे देऊळ बांधले.त्यांची भक्ती पाहून देवी आई त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांना अज्ञातवासात कोणीही ओळखू शकणार नाही असे वर दिले.एकविरा देवी आई ही रेणुका मातेचा अवतार असल्याचे म्हटले जाते.
 
सदर मंदिर डोंगऱ्यावर असून तेथे जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात.हे मंदिर पुरातत्व विभागाद्वारे  संरक्षित असलेल्या कार्ल्याच्या लेण्यांनी वेढलेले आहे.मुख्य देऊळ आई एकवीरेचे असून तिच्या डावीकडे आई जोगेश्वरी आहे.
 
कसे जायचे -
हे मंदिर लोणावळ्यापासून 8 किमीच्या अंतरावर आहे.लोणावळ्यापासून आई एकविरेच्या मंदिरात जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने जाऊ शकतो.
लोणावळातून आटो रिक्षाने देखील जाता येतं. सेंट्रल पॉईंट लोणावळा (शिवनेरी बस स्टॉप) पासून 5 किमी. पुणे शहर (महाराष्ट्र) पासून 49 कि.मी. मुंबईपासून 97 कि.मी अंतरावर आहे. पुणे लोणावळा मार्गावर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे.
 
Edited By- Priya Dixit