रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (08:22 IST)

रक्तपेढी सुरु ठेवा २४ तास नाहीतर होणार कारवाई

राज्य रक्त संक्रमण परिषदे मोठा निर्णय घेतला आहे. रक्ताची गरज रुग्णांना दिवस-रात्र कधीही कोणालाही लागू शकते. या कारणामुळे रुग्णांना ज्यावेळी रक्त आवश्यक असेल त्याचवेळी जर रक्तपेढी बंद आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना ‘राज्य रक्त संक्रमण परिषदेने’दिल्यात. मुंबई उपनगरातील एका रुग्णालयातील पालिकेची रक्तपेढी रात्री बंद असल्याची तक्रार ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’ला रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली होती, त्याच तक्रराची दखल घेत परिषदेकडून ही सूचना दिली गेली आहे. वांद्रे येथील ‘के.बी. भाभा’रुग्णालयातील रक्तपेढी बंद आहे याबबत तक्रार चेतन कोठारी यांनी ‘राज्य रक्त संक्रमण परिषदे’कडे केली, रक्तपेढी रात्री बंद असल्याने इतर खासगी रक्तपेढ्यांचे काम मात्र जोमात सुरु होते, असे समोर आले. ही गंभीर तक्रार परिषदेला मिळाली त्यामुळे परिषदेकडून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला गेला, त्यावर परिषदेने पालिकेकडून खुलासा मागवला आहे. सोबतच  ही रक्तपेढी परत रात्रीची बंद आढळली तर कारवाई करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमची ही तक्रार असेल तर ती नक्की नोंदवा त्यामुळे कोणाचा तरी जोव नक्की वाचेल.