गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (08:59 IST)

एकहाती सत्ता द्या, चमत्कार घडवून दाखवेन : राज ठाकरे

raj thakare
माझ्या हाती एकहाती सत्ता द्या मी चमत्कार घडवून दाखवेन असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केलं आहे. पुण्यातील  एका कार्यक्रमाला राज ठाकरेंनी हजेरी लावली होती.  यासाठी त्यांनी महापालिकेचंही उदाहरण दिलं. पुणे महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. इथेही बदल घडवायचा असेल तर ते तुमच्या हाती आहे. मला एकहाती सत्ता द्या आणि मग बघा मी कसा चमत्कार घडवतो. निवडणुका जवळ आल्या आहेत माझा तोफखाना तयार आहे. मी फक्त आचारसंहितेची वाट बघतो आहे. निवडणुका लागल्या की पुण्यात येईन ज्यांची फाडायची त्यांची फाडेनच असाही इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.