रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 11 मे 2019 (17:18 IST)

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात केशरी आंब्याची आरास

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात केशरी आंब्याची आरास करण्यात आली असून, विठोबा रखुमाईचे मंदिर आमराईसारखे बहरले आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त आंब्याचे व्यापारी विनायक कांची यांनी तब्बल 11 हजार अस्‍सल हापूस आंबे विठ्ठलास अर्पण केले त्यातून ही आरास केली आहे.
 
बाजारात हापूस आंब्याचा असणारा दर लक्षात घेता सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे हे आंबे आहेत. या सर्व आंब्याची आरास मंदिर, गाभाऱ्यात करण्यात आली आहे. आंब्यासोबत आंब्याचे हिरवे डहाळे बांधल्यामुळे त्‍यातचे गाभार्‍यात मधुर आंब्‍याचा दरवळ पसरल्‍याने आमराईत आल्याचा भास भाविकांना होतोय. सकाळपासूनच दर्शनास आलेल्या भाविकांकडून अभिनव आरासीचे कौतुक केले आहे. आंब्याचा रस करून देवस्थानच्या अन्नछत्रात भाविकांना दोन, ते तीन दिवस पुरवला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दै पुढारीशी बोलताना दिली.

फोटो : सोशल मीडिया