गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 21 मे 2022 (08:01 IST)

केतकी चितळेला आता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलिस कोठडी

ketki chitale
वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी ती सध्या तुरूंगात आहे. त्यातच आता अॅट्रॉसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या) नुसार तिला अटक झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे. त्यामुळे तिची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी तिने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली. राज्यातील जवळपास १५ पोलिस स्टेशनमध्ये तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिला सुरुवातीला पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यातच तिच्याविरुद्ध दाखल अॅट्रॉसिटीचा गुन्हाही समोर आला आहे. २०२०मध्ये तिच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळीही तिने सोशल मिडियावर अनुसुचित जातीच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडियामध्ये शेअर केली होती. त्यानंतर तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. आता या प्रकरणातही तिला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.