सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (18:04 IST)

भोंदूबाबाने घेतला मुलाचा जीव

jadu tona
वर्धा जिल्ह्यात आर्वीमध्ये तंत्रमंत्रांनी उपचार करत आहो असे सांगून मुलाला उपचारासाठी घेऊन गेलेल्या भोंदूबाबाच्या हातून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. हा नरबळीचा प्रकार असल्याची शंका व्यक्त केली जात असून या प्रकरणी तांत्रिक बाबासह दोन मुलांना अटक करण्यात आली आहे. आर्वी पोलिसांनी बाबासह त्याच्या दोन्ही मुलांवर कलम 302,201,34 भा.दं.वि सह कलम 3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.