गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (12:09 IST)

नवरीचा हळदीच्यासमारंभाच्या दिवशी दुर्देवी मृत्यू

The unfortunate death of the bride on the day of the turmeric ceremony नवरीचा हळदीच्यासमारंभाच्या दिवशी दुर्देवी मृत्यू
मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये लग्नघरात शोककळा पसरली आहे. या लग्नघरात हळदीच्यासमारंभाच्या दिवशी नवरीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मेघा काळे असे या मयत नवरीचे नाव असून ती एम.बी.बी एस. डॉक्टर होती. तिने प्राथमिक शिक्षण छिंदवाड्यात घेतले होते. पुढील शिक्षण तिने नाशिक आणि मुंबईत शिक्षण घेतले असून ती मुंबईतच प्रॅक्टिस करायची. 

मेघा हिचे लग्न 20 मे रोजी तिचे लग्न छिंदवाड्यातील शहनाई हॉल मध्ये होते. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. त्या दिवशी तिने ढोकळा खालला आणि तिला जोराचा  ठसका लागला. तिने पाणी प्यायले पण तिला काहीच बोलता येत नव्हते. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तिच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तिचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. ढोकळ्याचे नमुने गोळा करून लॅब मध्ये नमुने पाठविण्यात आले आहे.