1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (10:14 IST)

ट्रक अपघातात चौघांचा मृत्यू

Four killed in truck accident ट्रक अपघातात चौघांचा मृत्यू
चंद्रपूर -मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळ काल रात्री दोन ट्रक धडकून झालेल्या भीषण अपघातात ट्रक ला आग लागून चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
 
चंद्रपूर -मूल मार्गावर अजयपूर गावाजवळ पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण आग लागली. ट्रकचे तयार फुटल्याने आग भडकली आणि त्यात होरपळून चौघांचा मृत्यू झाला. 
 
या अपघातानंतर संपूर्ण रस्त्यावर आग पसरून वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन पथके आग विझविण्यासाठी मूल- चंद्रपूर येथून घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. मूल -रामनगर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ट्रक मधील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.