मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (22:59 IST)

खडसे यांची नऊ तास मॅरेथॉन चौकशी पूर्ण

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची नऊ तास मॅरेथॉन चौकशी झाली. सकाळी ११ वाजताच्या सुमारास खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. खडसे यांचे वकील प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले, आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले. काही कागदपत्रे देखील दिली. यापुढे जेव्हा कधीही ईडी बोलवेल तेव्हा आम्ही हजर राहू असे देखील वकील पुढे म्हणाले.   
 
एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मंगळवारी सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली होती. ईडी न्यायालयाने त्यांना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. यानंतर एकनाथ खडसेंना चौकशीसाठी समन्स पाठविले होते. यावर खडसेंनी ही राजकीय हेतूने प्रेरित कारवाई असल्याचा आरोप केला. तसेच आपण ईडीला सहकार्य करणार असून त्यांना हवी असलेली माहिती मी देणार आहे. परंतू मला यात राजकीय वास येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा भूखंड खासगी आहे. एमआयडीसीने सांगावे की तो भूखंड आपला आहे, जमीन मालकाला मोबदला दिला आहे, असे सांगितल्यास मी दोषीच असेन. कुछ तो होने वाला है, असे मेसेज जळगावात फिरत आहेत. पातच वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा काढले, मला अडकविण्याच प्रयत्न असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.