रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (13:02 IST)

सुलतान चित्रपटाला 5 वर्ष पूर्ण

या चित्रपटाची कहाणी आहे सुलतान अली खान ची हा एक खेळ पृष्ठभूमीवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट कुस्ती खेळावर आधारित असून एक प्रेम कहाणी आहे. सलमान खान आणि अनुष्का शर्मा अभिनित हा चित्रपट कुस्ती या खेळा वर असून या चित्रपटात सलमान खान आणि अनुष्का शर्मा ने कुस्तीपटूची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटात ते एकमेकांशी लढतांना दिसले होते. हा चित्रपट 6 जुलै 2016 रोजी रिलीझ झाला असून यशराज फिल्म्स च्या बॅनर खाली बनलेले हे चित्रपट होते. याचे दिगदर्शक अली अब्बास जफर आहे.या चित्रपटाची कहाणी आहे सुलतान अली खान ची हा एक स्थानिक कुस्ती पटू असून त्याचे स्वप्न ऑलम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे. हेच स्वप्न खेड्यात राहणाऱ्या आफरा नावाच्या तरुणीचे देखील आहे. ही देखील कुस्ती पटू आहे. या दोघांचे स्वप्न एकच असतात.त्यासाठी त्यांचे संघर्ष सुरु असण्याची ही कहाणी आहे.
 
या चित्रपटासाठी सलमान ने खूप मेहनत केली असून हरियाणवी पहलवानाची भूमिका साकारली होती.अनुष्काने देखील या चित्रपटासाठी पहलवानाची भूमिका साकारली असून कुस्ती केली आहे.