सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (18:51 IST)

अटक टाळण्यासाठी खडसे यांनी हायकोर्टात धाव, सोमवारी कोर्ट महत्वाचा निकाल देणार

ईडीनं अटकेची कारवाई करू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्या याचिकेत ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. आपण तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची खडसे यांनी या याचिकेतून मागणी केली आहे. या प्रकरणात सोमवारी कोर्ट महत्वाचा निकाल देणार आहे.
 
एकनाथ खडसे यांची 15 जानेवारीला ईडीकडून चौकशी झाली होती. 6 तास ही चौकशी झाली होती. भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीची समन्स आल्यानंतर खडसेंनी कोरोनाची लागण झाल्याने काही काळ क्वारंटाईन असल्याने चौकशीसाठी वाढीव कालावधी मागितला होता. त्यानंतर ते 15 जानेवारीला ईडी कार्यालयात हजर झाले होते.