गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (15:18 IST)

खडसे कन्या रोहिणी यांचे पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन; हे आहे कारण

rohini khadse
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे समर्थकाला भर रस्त्यावर महिलांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर या विरोधात खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आक्रमक झाल्या.  त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने ही बाब सर्वत्र चर्चेची ठरली आहे.
 
मुक्ताईनगरमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार होती. पण न्यायालयाच्या आदेशाने ही निवडणूक स्थगित झाली आहे. त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला आहे. खडसे समर्थकाला मुक्ताईनगरमधील एका चौकात दोन महिलांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरती बघणाऱ्यांची ही बरीच गर्दी जमली होती. यात शिवीगाळ आणि मारहाण हे सुरू होतं. सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट वायरल केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे आरोप होत आहेत. आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही असे प्रकार करता का? असा सवाल करत या महिलांनी या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. हा राष्ट्रवादीचा खडसेंचा कार्यकर्ता आहे, यात या कार्यकर्त्यावर महिलांनी गंभीर आरोप केले आहेत.
 
या मारहाणी विरोधात खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यांनी कार्यकर्त्यांसह थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचलेल्या रोहिणी खडसे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे कळते. मारहाणीच्या निषेधार्थ पोलीस स्टेशन समोर रोहिणीताई खडसेंच्या नेतृत्वात कुटुंबीयांचा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू होतं.
 
न्याय मिळत नसल्यामुळे पोलीस स्टेशनच्या दालनात ठिय्या मांडल्याचे रोहिणी खडसे यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट करत व्हायरल केल्याच्या आरोपाखाली महिलांनी त्याला चोप दिला. आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही असे प्रकार करता? असा सवाल मारहाण करणाऱ्या महिलांनी केला आहे.