रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मे 2022 (08:50 IST)

"फडणवीसांनी मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम केलं"

eknath khadse
जळगाव- आरक्षणाच्या मुद्यावरुन सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळून 15 दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला  दिलेत. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता ओबीसी आरक्षणाबाबत एकनाथ खडसे  यांनी चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणीस  यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. ओबीसींचं आरक्षण हे घटनेनं दिलेलं आरक्षण आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होणार असून, ओबीसींचं राजकीय आरक्षण घालवण्याचा यामागचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. तसंच चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधल ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील आज महाविकासआघाडी वर हल्ला करत आहेत. मात्र मागच्या सरकारच्या काळातही ओबीसींचा प्रश्न तसाच होता.
 
भुजबळ पुढे म्हणाले की, ओबीसींना वगळून निवडणूका घेत असाल तर ओबीसी समाज कधीही क्षमा करणार नाही. कायदेशीर काही आणखी मार्ग आहे का? याबाबत सल्ला द्या, मात्र आरोप-प्रत्यारोप करून ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवू नका असा इशारा देण्यात आला आहे. 27% उमेदवार देणं म्हणजे मागासवर्गीय समाजाला न्याय मिळणार नाही. 27% उमेदवारांमध्ये खुल्या वर्गातच निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. सर्व पक्षांनी याबाबत तातडीने गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये याबाबत प्राधान्याने राज्य सरकार कडून अपेक्षा आहेत. राज्य सरकार यावर मार्ग काढेल याबाबत आम्ही आशेने बघतो.
 
देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, यांनी महाविकास आघाडीने दोन वर्षात काय केलं तर महाविकासआघाडीने विधानमंडळात ओबीसी आरक्षणाबाबत कायदा केला. मात्र मागच्या पाच वर्षात फडणीसांनी काय केलं?ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीसांनी जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत वेगवेगळी भूमिका घेतली. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत एकमेकांचं भांडण लावण्याचं काम फडणविसांनी केलं. तुमच्या पाच वर्षाच्या काळात हा प्रश्न सुटू शकला नाही आता त्यावर तुम्ही का प्रतिक्रिया देतात? आरोप-प्रत्यारोपापेक्षा ओबीसींवर होणारा अन्याय थांबवा असा सल्ला देवेंद्र फडणीस यांना खडसेंनी दिला आहे.