मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (23:48 IST)

Antilia Bomb Case :सचिन वाझे नाही तर,हा आहे मनसुख हिरेन हत्याच्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार -एनआयए

महाराष्ट्रातील मनसुख हिरेंनच्या हत्येप्रकरणी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, या खेळाचा खरा सूत्रधार मुंबई पोलिसांचा माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा(Encounter Specialist Pradeep Sharma) आहे.
 
एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, प्रदीप शर्मा यांच्या सांगण्या वरून पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी कट रचला आणि हिरेनची हत्या केली . वास्तविक, रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली होती आणि नंतर या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता.
 
न्यायमूर्ती एएस चांदूरकर आणि जीए सानप यांच्या खंडपीठासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने हिरेनला अँटिलिया स्फोटक प्रकरणाचे संपूर्ण रहस्य माहित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच प्रदीप शर्माने त्याला मारण्यास सांगितले. या प्रकरणातील अन्य आरोपींसोबत त्याने पोलिस आयुक्त कार्यालयाच्या इमारतीत अनेक बैठका घेऊन मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचला होता. हिरेनच्या हत्येनंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझे याने प्रदीप शर्माला 45 लाख रुपये दिले होते, जे काही मारेकऱ्यांमध्ये वाटण्यात आले होते.
 
एनआयएने प्रदीप शर्माच्या जामीन अर्जाला विरोध केला आणि म्हटले की त्याने गुन्हेगारी कट, खून आणि दहशतवादी कृत्यांचे गुन्हे केले आहेत. यादरम्यान एनआयएने असा युक्तिवाद केला की शर्मा हे अँटिलिया स्फोटक प्रकरणाची रचणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य होता.
 
याप्रकरणी NIA ने 17 जून 2021 रोजी प्रदीप शर्माला त्याच्या अपार्टमेंटमधून अटक केली होती. सचिन वाझे शर्माला आपला गुरू मानत असे आणि त्यांच्या आदेशानुसार ते काम करायचे. शर्मा यांच्या मोबाईल फोन, लॅपटॉपमधून एनआयएला मनसुखच्या मारेकऱ्यांना पैसे हस्तांतरित केल्याचा पुरावा सापडला होता.
 
प्रदीप शर्मा हे ठाण्यातील खंडणीविरोधी कक्षात काम करायचे. 1990 च्या दशकात मुंबईतून अंडरवर्ल्डचा सफाया करण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचची टीम तयार करण्यात आली तेव्हा शर्मा यांचा त्यात समावेश होता.
 
25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या घर अँटिलियाच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती . ही कार मनसुख हिरेन यांची होती. शर्मा यांच्या सांगण्यावरून वाझे ने मनसुखवर गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी दबाव टाकला होता, मात्र मनसुख त्यासाठी तयार नव्हता. नंतर 5 मार्च 2021 रोजी मनसुखचा मृतदेह एका छोट्या नदीत सापडला.