1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (16:27 IST)

खडसे यांना कोरोना, सर्दी खोकल्याचा झाला त्रास

Khadse suffered
काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. आता ते कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना आता १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खडसे यांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत होता. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपली कोरोना चाचणी  केली होती. ती पॉझिटिव्ह आली आहे.
 
या कोरोनाच्या चाचणीचा अहवाल रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याच त्यात समोर आले आहे. या घटनेला खडसे परिवाराकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. तसे त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोरोनाच्या सदृश लक्षणे आढळून आल्याने खडसे यांनी ईडी चौकशीसाठी जाण टाळले होते. त्यांनी दिवसांची मुदत मागितली होती.