शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (15:48 IST)

कोरोना लक्षणे दिसल्यामुळे खडसे ईडी कार्यालयात जाणार नाहीत

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी नोटीस पाठवत त्यांना आज ३० डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे खडसे आज ईडी कार्यालयात जाणार नाहीत. कोरोनाची सदृष्य लक्षणे दिसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार १४ दिवसानंतर ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. एकनाथ खडसे यांनी एक पत्रक जारी करत माहिती दिली आहे.
 
ईडीने ३० डिसेंबर २०२० रोजी मुंबई कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, २८ डिसेंबरला ताप, सर्दी आणि कोरडा खकल्याचा त्रास जाणवल्याने वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीत कोरोनाची सदृष्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अहवाल अजून आलेला नाही. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार १४ दिवस विश्रांती आवश्यक असून तसं ईडी कार्यालयाला कळवलं. ईडीने १४ दिवसानंतर हजर राहण्यासंबंधी संमती दिलेली आहे, असं एकनाथ खडसेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.