गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (16:06 IST)

ईडी प्रकरणावरून शिवसेनेची बॅनरबाजी

Shiv Sena
ईडी प्रकरणावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. डोंबिवलीमध्ये स्टेशन परिसरात शिवसैनिकानी संजय राऊत यांनी भाजपविरोधात केलेल्या विधानाचे बॅनर झळकावले असून राऊत याना पाठिंबा दर्शवला आहे. 
 
संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ईडी आणि भाजपवर टीकेची तोफ डागली. भाजपच्या कार्यालयात ED चा टेबल टाकला आहे का? भाजपचा पोपट असला तरी मी ED चा आदर करतो. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देशा सोडावा लागेल, अशी विधानं करत संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला होता.