1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 डिसेंबर 2020 (15:46 IST)

राज्यातला लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवला

महाराष्ट्रातही करोनाचं संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. यामुळेच करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असं जाहीर केलं आहे.

राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे.                                                        
राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकार करोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचं सांगितलं आहे. तसंच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे.