1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (12:45 IST)

विश्वास नांगरे पाटील यांच्या वर किरीट सोमय्याने आरोप केल्यामुळे पाटीलांच्या अडचणीत वाढ

Kirit Somaiya's allegations against Vishwas Nangre Patil increase Patil's difficulty Maharashtra News Regional Marathi News Webdunia Marathi
सध्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्या आणि नेते विरोधात घोटाले करण्याबाबत आरोपांची मालिका सुरु केली असताना सोमय्या यांनी थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या वर आरोप केल्यामुळे नांगरे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  
 
सोमय्या यांनी नांगरे पाटील यांच्या वर आरोप केला आहे की,त्यांनी आपल्या पोलीस अधिकाराचा वापर काही भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यासाठी केला आहे.सोमय्यांनी नांगरे पाटील यांच्या विरोधात मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे.त्यांनी म्हटले की मी कोल्हापूरला जात असताना मला मुंबईत रोखले गेले आणि  मला सहा तास घरात कोंडून ठेवले.
 
या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य म्हणाले की ,किरीट सोमय्यांनी केलेली तक्रार अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही कदाचित इतर सदस्यांकडे गेलेली असावी.या संदर्भातील राज्यसरकारशी विचारणा करून त्याचे अहवाल मागवून हे प्रकरण आयोग हाताळेल.असे त्यांनी सान्गितले.