मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (10:23 IST)

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांचा शेतकरी बांधवांसाठी पॅकेज जाहीर

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीसाठी पेकेज जाहीर करू शकतात.अशी माहिती केबिनेट मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.येत्या आठवड्यात मदतीच्या पॅकेज ची घोषणा केली जाऊ शकते.
 
शेतकरी झालेल्या नुकसानीमुळे पुन्हा आपल्या पायावर उभारला पाहिजे.त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा होऊ शकेल.ती मदत कोणत्या स्वरूपात असेल त्याची घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील.शेतकरी बांधवाने काळजी करू नये,राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे सरकारकडून त्यांना पाहिजेती मदत केली जाईल असे अमित देशमुख यांनी माहिती दिली आहे.
 
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासन लवकरात लवकर पीकविमा व अन्य शासकीय स्वरूपाची मदत जाहीर करेल. शेतकरी बांधवांनी हारून जाऊ नये.त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पुरेशी मदत केली जाईल.विमा धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारचे शिष्ट मंडळ दिल्लीत चर्चा करण्यासाठी जाणार आहे.असं मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.