1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Kolhapur farmer commits suicide

कोल्हापूरमध्ये सावकाराच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये, ९ लाख रुपयांच्या कर्जापैकी २६ लाख रुपये भरल्यानंतरही सावकाराने अतिरिक्त २५ लाख रुपयांची मागणी केल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या सोंगे गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सावकाराकडून होणाऱ्या कथित मानसिक छळ, शिवीगाळ आणि सततच्या धमक्यांना कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याचे नाव श्रीधर दावरे असे आहे.
 
माहितीनुसार शेतकरी श्रीधर दावरे यांनी काही वर्षांपूर्वी शेती आणि इतर गरजांसाठी केवळ ९ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही संपूर्ण घटना २३ सप्टेंबर रोजी घडली. आत्महत्या करण्याच्या अगदी आधी, मानसिकदृष्ट्या खचलेल्या श्रीधर दावरे यांनी त्यांची पत्नी सविता दावरे यांना त्यांच्या मोबाईल फोनवर एक संदेश पाठवला. या संदेशात त्यांनी आपल्या पत्नीची माफी मागितली आणि खिशात असलेल्या सुसाईड नोटचे दोन फोटो काढून ते तिला व्हॉट्सॲपवर पाठवले. संदेश पाठवल्यानंतर लगेचच श्रीधरने विष प्राशन केले.
संदेशाबद्दल कळताच त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. त्यांनी तात्काळ श्रीधरचा शोध घेतला आणि बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, उपचारादरम्यान अखेर श्रीधरचा मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याची पत्नी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
प्रत्येक मुद्द्यावर राजीनाम्याची मागणी करणे अन्यायकारक! झुरळ जनता पक्षाने आपले नाव बदलून 'राजीनामा जनता पक्ष' ठेवावे-रामदास आठवले