गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (14:20 IST)

Kolhapur: केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग, चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

fire
कोल्हापुरातील संगीत सम्राट केशवराव भोसले यांच्या 134 जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत सुदैवाने जनहानी झाली नाही. मात्र नाट्यगृहाच्या काही भाग कोसळला असून छत कोसळले आहे. खासबाग कुस्ती मैदानाच्या शेडला आग लागून सर्वत्र आग पसरली. नाट्य गृहातील इमारतीचे जातीत जास्त सामान लाकड्याचे असल्यानं आग सर्वत्र झपाट्यानं पसरली. अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल  झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. 
 
अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच नाट्यगृहाची पुन्हा उभारणी करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. 
Edited by - Priya Dixit