शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (13:47 IST)

कोल्हापुरात कृष्णा नदी ओलांडणारा ट्रॅक्टर उलटला,7-8 जण वाहून गेले, तिघांचे मृतदेह सापडले

river
कोल्हापुरात कृष्णा नदी ओलांडणारा ट्रॅक्टर पाण्यात उलटून 7-8 जण वाहून गेले. तिघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरु आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी येथे शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात  हा अपघात घडला. 

कृष्णानदीला अनेक लोक ट्रॅक्टर मध्ये बसून नदी ओलांडत असताना ट्रॅक्टर नदीच्या मध्यभागी जाऊन पालटला त्यात बसलेले 7 ते 8 जण वाहून गेले.त्या पैकी तिघांचे मृतदेह सापडले आहे. हे सर्व जण केळी काढण्यासाठी ट्रॅक्टर मध्ये बसून केळीच्या शेतात जात असताना ट्रॅक्टर चालकाची वाट चुकल्यामुळे ट्रॅक्टर नदीत पडून हा अपघात झाला.  

अपघाताची माहिती मिळाल्यावर स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले एनडीआरएफला माहिती दिली. एनडीआरएफची टीम शोध आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली.तिघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध घेतला जात आहे.
Edited By- Priya Dixit